Chess Competition 2019

Chess Competition 2019

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय , रायगड विभागातर्फे पनवेल ग्रामीण तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल ,देवद-पनवेल येथे दिनांक १४ सप्टेंबर २०१९ रोजी आयोजित करण्यात आल्या . रायगड जिल्हा निवड चाचणीसाठी पनवेल ग्रामीण तालुकास्तरीय संघ निवड करण्यासाठी घेण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत पनवेल ग्रामीण ९ शाळांमधील ९० स्पर्धकांनी भाग घेतला. हि स्पर्धा १४ /१७/१९ वर्ष मुले/मुली अशा सहा गटात खेळविण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन श्री. बापूसाहेब डी.डी. विसपुते प्रायमरी इंग्लिश मिडीयम स्कूल ,देवद-पनवेलच्या प्राचार्या डॉ. आरिफा शेख ह्यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी आदर्श शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. धनराज विसपुते ,पनवेल चेस असोसिएशनचे सचिव- चंद्रशेखर पाटील, श्री.शिवाजी डोंगरदिवे क्रीडाप्रमुख , हितेश कडू ,क्रीडाशिक्षक , प्रवीण जाधव,तुषार पाटील सुशांत पाटील उपस्थित होते. स्पर्धेचे वैशिष्ट म्हणजे सलग दुसर्यावर्षी घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्रत्येक गटातील प्रथम दोन विजेत्यांना चषक देण्यात आले . प्रत्येक गटातील पाच विजेत्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली.स्पर्धेसाठी प्रमुख पंच चंद्रशेखर पाटील ,संगणक पंच श्रेया पाटीलयांनी काम पाहिले स्पर्धा अत्यंत उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या . स्पर्धापार पाडण्यासाठी सिद्धेश ठिक, रणधीर पाटील,जीवन पाटील ह्यांनी सहकार्य केले. बक्षीससमारंभप्रसंगी सी. एन .पाटील यांनी विसपुते स्कूलने बुद्धिबळ स्पर्धा आयोजन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले तसेच प्रत्येक गटातील दोन विजेत्यांना चषक देण्याच्या कल्पनेचे कौतुक करून निवड झालेल्या स्पर्धकांनी सराव करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

For More Details & Admission Contact

Location: Devad – Vichumbe, New Panvel, TAL- Panvel, Dist- Raigad, Adjacent to Mumbai- Pune Express Highway.

Telephone: (+91) 9920 098 088 / (+91) 9769 370 275 / (+91) 8976 196 534.

Email: visputeschoolpnvl@gmail.com

School Hours: 8.00 AM – 12.30 PM